Lokrakshanay
Tuesday, August 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

“आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच..”, अंबरनाथ रेल्वे रूळांशेजारी भिंत उभारण्यास स्थानिकांचा विरोध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 18, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
“आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच..”, अंबरनाथ रेल्वे रूळांशेजारी भिंत उभारण्यास स्थानिकांचा विरोध
Share on FacebookShare on Whatsapp

अंबरनाथ : अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांशेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू करताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला. सध्या येथून पूर्व पश्चिम प्रवासासाठी कोणताही पूल अथवा पादचारी पूल नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भिंत उभारल्यास पूर्वेकडील भागात जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागणार आहे. त्याचा परिणाम मोरिवली गावातून शेजारच्या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, घरकामगार महिला यांना सहन आहे. त्यामुळे आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच भिंत बांधा, अशी ठाम मागणी महिलांनी केली असून त्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाला तात्पुरते माघार घ्यावी लागली.

अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा आणि बि कॅबिन परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागात आता हजारो कुटुंबे वास्तव्यास असून, त्याठिकाणी घरकाम तसेच विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पश्चिमेकडून दररोज हजारो महिला घरकामासाठी या भागात येतात, तर आनंदनगर एमआयडीसीत नोकरी करणारे शेकडो पुरुष, महिला रेल्वे रुळ ओलांडूनच पूर्वेकडील भाग गाठतात. सध्या खुल्या असलेल्या या मार्गामुळे पादचाऱ्यांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. मात्र रेल्वेच्या विकास योजनेतर्गत बांधली जाणारी सुरक्षा भिंत उभारल्यास हा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल.

Previous Post

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

Next Post

ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी, वाळेकरांच्या हल्ल्याप्रकरणी १४ वर्षांनी आरोपीला अटक

Next Post
ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी, वाळेकरांच्या हल्ल्याप्रकरणी १४ वर्षांनी आरोपीला अटक

ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी, वाळेकरांच्या हल्ल्याप्रकरणी १४ वर्षांनी आरोपीला अटक

BreakingNews

उत्तन-विरार सागरी सेतू थेट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणार!

जमीन मोजणीसाठी ई-पोस्ट प्रणाली सुरू; नोटिसा स्पीड पोस्टने थेट घरपोच

फ्रेंडशिप डे स्पेशल: युवा स्पंदनचा कौतुकास्पद उपक्रम; पोलीस आणि नागरिकांमधील मैत्रीचा धागा होणार घट्ट

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.