Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी ६ जूनपासून; विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्याची संधी

१३ जूनला जाहीर होणार प्रवेश वाटप यादी; १६ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 5, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी ६ जूनपासून; विद्यार्थ्यांना अर्ज दुरुस्ती आणि पसंतीक्रम भरण्याची संधी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता प्रवेश प्रक्रियेची नियमित दुसरी फेरी ६ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ६ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जाचा भाग-१ दुरुस्त करता येणार असून भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्ज लॉक करणे अनिवार्य राहणार आहे.

नियमित दुसऱ्या फेरीतील प्रवेश वाटप प्रक्रिया १० ते १२ जूनदरम्यान पार पडणार असून १३ जून रोजी सकाळी १० वाजता प्रवेश वाटप यादी, कट-ऑफ यादी आणि इतर संबंधित माहिती अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही पाठविण्यात येईल. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच कालावधीत महाविद्यालयांकडूनही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दुसऱ्या फेरीतील सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १८ जून रोजी पुढील फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून १९ जून रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर वेळापत्रकानुसार सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन संचालनालयाने केले आहे.

Previous Post

मुंबई-ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याला लवकरच हिरवा कंदील

Next Post

दिल्ली-NCR मध्ये जुन्या ट्रक-बसेसना रामराम! ५,०४१ कोटींच्या योजनेला केंद्राची मंजुरी

Next Post
दिल्ली-NCR मध्ये जुन्या ट्रक-बसेसना रामराम! ५,०४१ कोटींच्या योजनेला केंद्राची मंजुरी

दिल्ली-NCR मध्ये जुन्या ट्रक-बसेसना रामराम! ५,०४१ कोटींच्या योजनेला केंद्राची मंजुरी

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.