Lokrakshanay
Thursday, May 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

क्यूआर कोडद्वारे बियाण्यांचा संपूर्ण इतिहास तपासता येणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 20, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शेतकऱ्यांना बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या सहकार्याने ‘साथी’ पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलमुळे बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतचा संपूर्ण तपशील डिजिटल पद्धतीने नोंदवला जाणार असून, क्यूआर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाण्यांचा इतिहास सहज तपासता येणार आहे. कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी हे बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेकडे टाकलेले महत्त्वाचे डिजिटल पाऊल मानले जात आहे. ‘साथी’ पोर्टलची अंमलबजावणी २०२३ पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली असून, २५ एप्रिल २०२५ पासून सत्यप्रत बियाण्यांसाठी उत्पादकांची नोंदणी, उत्पादनांची माहिती आणि विक्री प्रक्रिया अधिकृतरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर, गुणवत्तापूर्ण आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. ‘साथी’ प्रणालीद्वारे निर्माण होणाऱ्या क्यूआर कोडमुळे बियाण्यांच्या उत्पादनाचा स्वतंत्र इतिहास तपासता येणार असल्याने ट्रेसिबिलिटी, पारदर्शकता, गुणवत्तानियंत्रण आणि कायदेशीर पालन सुनिश्चित होईल. यामुळे शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील विश्वास वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बियाणे विक्रेत्यांना पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी लागणार असून, शेतकऱ्यांना बियाणे विकताना फार्मर आयडी नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांच्या संघटनांच्या सूचनांनुसार पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्याचेही कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. ‘योग्य बियाणे, योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत’ पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्व घटकांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

BreakingNews

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

धोकादायक व रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईला मान्यता; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.