Lokrakshanay
Sunday, July 5, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

नागपूरमधील जलक्रांती परिषदेत नाना पाटेकर यांची भावनिक आठवण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 20, 2026
in ताज्या बातम्या, नागपूर, मनोरंजन
‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जलक्रांती परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे तसेच पाणीसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी “राजकारणात एक रुपयाचं काम आणि दहा रुपयांची प्रसिद्धी असा नियम आहे,” असे वक्तव्य केले. तसेच समस्या जितकी मोठी, तितकी काम करणाऱ्यांची संख्या कमी असते, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, परिषदेत सर्वाधिक चर्चा झाली ती नाना पाटेकर यांच्या भाषणाची. ‘नाम फाऊंडेशन’च्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनुभव शेअर केले. विशेषतः नटसम्राट या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी नाटकाऐवजी सिनेमा करण्यामागील कारण स्पष्ट केले.

नाना पाटेकर म्हणाले की, “अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणं हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. प्रत्येक प्रयोगात पूर्ण जीव ओतावा लागतो. त्यामुळे मी नाटक करण्याऐवजी सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. १०-१५ प्रयोगांनंतर मी कदाचित मेलो असतो.” त्यांनी पुढे डॉ.श्रीराम लागू, दत्ता भट्ट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांचा उल्लेख करत त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. “या कलाकारांनी प्रत्येक प्रयोगात जीव ओतला. त्यांच्या अभिनयाची उंची गाठणं कठीण आहे,” असे ते म्हणाले. तसेच दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे अभिनयाच्या बाबतीत स्वतःपेक्षा कितीतरी श्रेष्ठ होते, असेही त्यांनी नमूद केले. ‘पुरुष’ नाटकाचा उल्लेख करताना त्यांनी प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामाचे वर्णन केले आणि “जो आनंद अभिनयातून मिळतो, तोच आनंद ‘नाम’चं काम करतानाही मिळतो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Previous Post

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

Next Post

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

Next Post
बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

BreakingNews

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत धडक कारवाई; पुणे-सोलापुरात सव्वा लाखांचा साठा जप्त!

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट ५ दिवस बंद!

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या; संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी महापालिकेचे आवाहन!

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला १० लाखांची मदत; दोषींवर कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा!

शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्हा परिषद शाळांची चमकदार कामगिरी; ५ वी व ८ वीतील ३९५ विद्यार्थी पात्र!

लंडनमध्ये उभारले जाणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ – उदय सामंत यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.