Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

प्रसिध्द लेखिका-दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 23, 2025
in मनोरंजन, मुंबई
प्रसिध्द लेखिका-दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आशियाई चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गेली दोन दशकांहून अधिक काळ मुंबईकरांना आशियाई देशांमधील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या २२ व्या थर्ड आय चित्रपट महोत्सवाची घोषणा सोमवारी करण्यात आली. ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात यंदा प्रसिध्द लेखिका-दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर ख्यातनाम लेखिका, कास्टिंग डिरेक्टर उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

आशियाई चित्रपटांबरोबरच विविध भारतीय भाषांमधील चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन ९ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. यंदा महोत्सवात एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून हे चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक संतोष पाठारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचे उद्धाटन बुसान चित्रपट महोत्सवात फ्रीप्रेस्की परीक्षक पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन युवर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाने होणार आहे. तसेच, महोत्सवातील महत्वाच्या पुरस्कारांबरोबरच दिवंगत चित्रपट अभ्यासक, समीक्षक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक मिनाक्षी शेड्डे यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम आणि लेखक, गीतकार, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन उपस्थित होते.

Previous Post

बँकॉकहून आणलेला २० कोटींचा गांजाचा साठा जप्त

Next Post

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटका

Next Post
अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटका

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटका

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.