Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ससून रुग्णालयात ३५४ पदांसाठी भरती सुरू, ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी केले अर्ज

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 30, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
ससून रुग्णालयात ३५४ पदांसाठी भरती सुरू, ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी केले अर्ज
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरली जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात कक्षसेवकांची सर्वाधिक १६८ पदे असून, आया ३८, सेवक ३६, पहारेकरी २३, शिपाई २, क्ष-किरण सेवक १५, हमाल १३, रुग्णपटवाहक १०, सहायक स्वयंपाकी ९, नाभिक ८, स्वयंपाकी सेवक ८, प्रयोगशाळा सेवक ८, बटलर ४, दवाखाना सेवक ४, माळी ३, प्रयोगशाळा परिचर १, भांडार सेवक १, गॅस प्रकल्प चालक १ अशी पदे आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहेत. आयबीपीएस कंपनीकडे या भरती प्रक्रियेचे काम देण्यात आले.  ससून रुग्णालयात अनेक वर्षांनी ही सरळसेवा भरती होत आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने अर्जांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे. या भरतीतील प्रत्येक संवर्गासाठी सामाजिक आरक्षण लागू आहे. ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेणी १५ ते ४७ हजार ६०० रुपये आहे.

Previous Post

गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास भाईंदरमधील गावकऱ्यांचा विरोध

Next Post

मराठा आंदोलनाचा मुंबईतील कामगारांना आर्थिक फटका; फॅशन स्ट्रीट सलग तीन दिवस बंद

Next Post
मराठा आंदोलनाचा मुंबईतील कामगारांना आर्थिक फटका; फॅशन स्ट्रीट सलग तीन दिवस बंद

मराठा आंदोलनाचा मुंबईतील कामगारांना आर्थिक फटका; फॅशन स्ट्रीट सलग तीन दिवस बंद

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.