मुंबई : आजपासून भारतात रे-बॅन मेटा (Gen 2) एआय ग्लासेस् उपलब्ध असणार आहेत. ज्यामध्ये व्हिडिओ कॅप्चर क्षमता, सुधारित बॅटरी लाइफ, अपग्रेडेड मेटा एआयचा समावेश असेल असे कंपनीने स्पष्ट केले होते. हे कलेक्शन देशभरात Ray-Ban India वर आणि आघाडीच्या ऑप्टिकल व आयवेअर रिटेलर्सकडे उपलब्ध असेल असे कंपनीने म्हटले आहे उपलब्ध माहितीनुसार या ग्लासची किंमत ३९९०० रूपयांपासून सुरू होते.
स्मार्ट ग्लासेसचे फिचर्स –
- फर्स्ट-जनरेशन रे-बॅन मेटा ग्लासेसना मिळालेल्या यशाच्या आधारावर रे-बॅन मेटा (जेन २) शार्पर ३के अल्ट्रा एचडी व्हिडिओ कॅप्चर, अल्ट्रावाइड एचडीआर आणि अपग्रेडेड मेटा एआय
- जवळपास ८ तासापर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी
- २० मिनिटांमध्ये जवळपास ५०% फास्ट चार्जिंग आणि अतिरिक्त ४८ तास पॉवर देणाऱ्या चार्जिंग केससह रे-बॅन मेटा (जेन २) डिझाइन करण्यात आले आहे.
- हायपरलॅप्से व स्लो मोशन यांसारखे नवीन कॅप्चर मोड्स नंतर सॉफ्टवेअर अपडेट्सच्या माध्यमातून सादर करण्यात येतील असे कंपनीने म्हटले.
लवकरच या अंतर्गत डिजिटल पेमेंट देखील करता येणार आहेण असा दावा कंपनीने केला. रे-बॅन मेटा (जेन २) ग्लासेसच्या माध्यमातून सुरक्षितपणे यूपीआर क्यूआर-कोड पेमेंट्स करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

