Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

एक हजाराहून अधिक प्रवाशांवर गेल्या ११ महिन्यात दंडात्मक कारवाई; रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार ठाणे स्थानकात सुरूच

गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
एक हजाराहून अधिक प्रवाशांवर गेल्या ११ महिन्यात दंडात्मक कारवाई; रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार ठाणे स्थानकात सुरूच
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : रेल्वे रूळ ओलांडतांना होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन तसेच पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी ठाणे आणि लगतच्या स्थानक परिसरात प्रवाशांकडून रुळ ओलांडण्याचे प्रकार सुरुच असल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी गेल्या ११ महिन्यात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या १ हजार १०७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच अपंगाच्या डब्यातून बेकायदेशीररित्या प्रवास करणाऱ्या २ हजार ६५६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवासी सेवेसाठी एकूण पाच पादचारी पूल आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या पूलांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याच गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात. रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वेळेवेळी प्रयत्न केले जातात. तरी देखील अनेक प्रवासी रूळ ओलांडून प्रवास करतात. या प्रवाशांवर ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. १ जानेवारी ते २८ नोव्हेंबर या कालावधीत १ हजार १०७ प्रवाशांवर रूळ ओलांडत असल्याने कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे गाड्यांमध्ये अपंगासाठी विशेष डबा असतो. अनेकदा या डब्यांमधून सामान्य प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करतात. जानेवारीपासून नोव्हेंबर अखेरीपर्यंत अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २ हजार ६५६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

वांद्रे – कुर्ला दरम्यान धावणार बस; १० विद्युत दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल

Next Post

हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, मोटारगाडीची वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला धडक

Next Post
हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, मोटारगाडीची वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला धडक

हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, मोटारगाडीची वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला धडक

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.