Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, मोटारगाडीची वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला धडक

कुर्ला येथील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिली असून या अपघातात वाहतूक पोलिसाच्या पायाचे हाड मोडले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 30, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, मोटारगाडीची वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला धडक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : कुर्ला येथील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिली असून या अपघातात वाहतूक पोलिसाच्या पायाचे हाड मोडले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरगाडीचालकाला पोलिसाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र मोटरगाडीचा वेग वाढवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाने पोलिसाला धडक दिली. अपघातानंतर चालक तेथेच गाडी सोडून पळून गेला. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार लक्ष्मण मोजर (४९) कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मोजर मंगळवारी कुर्ला येथील एल.बी.एस. मार्गावर वाहतुकीचे नियमन करीत होते. तेथे वाहनांना पूर्ण वळसा घेऊन विरुद्ध दिशेला जाण्यास मानाई आहे. असे असतानाही हा वाहनचालक नियमभंग करीत पूर्ण वळण घेऊन घाटकोपरच्या दिशेला जाण्याच्या प्रयत्नात होता. मोजर यांनी त्याला मोटारगाडी थांबवण्याचा इशारा दिला. सुरुवातीला मोटारगाडीचा वेग कमी होता. पण मोजर यांनी थांबण्याचा इशारा देताच चालकाने मोटारगाडीची गती वाढवली व थेट मोजर यांना धडक दिली. त्यानंतर मोजर जमिनीवर कोसळले. अपघात झाल्यानंतर चालकाने गाडी तेथे सोडून पळ काढला. अपघातानंतर मोजर यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी चालकाची ओळख पटल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

एक हजाराहून अधिक प्रवाशांवर गेल्या ११ महिन्यात दंडात्मक कारवाई; रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार ठाणे स्थानकात सुरूच

Next Post

लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांकडून आरपीएफ कडून ४६ हजार रुपये दंड वसूल

Next Post
लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांकडून आरपीएफ कडून  ४६ हजार रुपये दंड वसूल

लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांकडून आरपीएफ कडून ४६ हजार रुपये दंड वसूल

BreakingNews

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.