Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित आणि सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत आरोग्य खाते कार्ड’ (आभा कार्ड) योजनेला वेग देण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांचे ‘मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट’ अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईतील नागरिकांना आभा कार्डच्या माध्यमातून आरोग्य सुविधा आणि उपचार अधिक सुलभपणे मिळावेत, यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांची आभा कार्ड नोंदणी करण्याबरोबरच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ तयार करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांनी या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे.

‘मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट’ अभियानाची जबाबदारी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त आणि उपायुक्त या अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. महापालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांची आरोग्य सुविधा नोंदणी करणे तसेच पात्र डॉक्टर, परिचारिका, आयुष वैद्य, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट यांसारख्या आरोग्य सेवा व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जनजागृती, अधिकारी-कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे प्रशिक्षण तसेच प्राथमिक नोंदणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात महापालिका रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, प्रसूतिगृहे, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि शिधावाटप केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात येतील. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि वंचित घटकांसाठी घरपोच सेवा तसेच विशेष जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यांच्या आभा कार्ड नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी शिधावाटप केंद्रांवर प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्रता तपासणीनंतर सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या आरोग्य नोंदी आभा कार्डशी जोडणे हा आहे. तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये ई-प्रिस्क्रिप्शन, ई-डिस्चार्ज समरी, डिजिटल लॅब अहवाल, रेडिओलॉजी रिपोर्ट आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थापन प्रणाली यांसारख्या सुविधा वाढवून आरोग्य सेवा अधिक आधुनिक आणि सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Previous Post

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

BreakingNews

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.