मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १० विद्युत दुमजली वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. या बस वांद्रे – कुर्लादरम्यान धावणार असल्याने पूर्व – पश्चिम उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत नव्या वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या धावत आहेत. या बसगाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसगाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे. ही मागणी विचारात घेऊन बेस्टच्या ताफ्यात १० नवीन वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या बसगाड्या बेस्ट बस मार्ग क्रमांक ३१० वर वांद्रे बस टर्मिनस – कुर्ला रेल्वे स्थानक (प) दरम्यान धावणार आहेत.