Lokrakshanay
Monday, May 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 25, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्याच्या बुधवार पेठेने आता भारतातील ‘बांगलादेश’ अशी ओळख निर्माण केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दर महिन्याला पोलिसांकडून छापा कारवाई करून बांगलादेशी महिला, मुले आणि धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलांना पकडले जात आहे. त्यांना याठिकाणी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड काढून सुव्यवस्थितरित्या इथे पोहचवले जात आहे. विशेष म्हणजे पुण्याचा सुमित चव्हाण याचा मास्टर माईंड असल्याचेही समोर आले आहे. या महिलांना आसाम, पश्चिम बंगाल व झारखंड तसेच उत्तरप्रदेश येथून कागदपत्रे तयारकरून दिली जात असल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेले आहे. या माहितीनंतर आता पोलिसांकडून एजंट, म्होरके आणि येथील साखळी मोडीत काढण्यासाठी व्यापक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. २८ एप्रिलपर्यंत बुधवार पेठेतून ३६ बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात १०३ बांगलादेशींना पकडण्यात आले आहे. बांगलादेशी मोहिमेत सर्वाधिक कारवाया बुधवार पेठेत होत असल्याचे समोर आले आहे. सातत्याने येथून बांगलादेशी महिलांना पकडण्यात येत आहे. या महिलांना एजंट भारतात आणल्यानंतर बेंगलोर, मुंबई याठिकाणी ठेवून तेथून पु्ण्यात आणत असल्याचे दिसून आले आहे. देशात बेकायदा प्रवेश करून पुण्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत. त्यांना भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील काढून दिले जात असल्याचे वारंवार केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या महिला बुधवार पेठेतील कुंठण- खान्यात ठेवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे.

पुणे पोलिसांनी गेल्या दोन वर्षापासून या बांगलादेशीविरोधात जोरदार मोहिम राबवली आहे. त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे नोंदवत त्यांची मायदेशी पाठवणी केली जात आहे. गेल्या वर्षी ८१ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार येथे अचानक कारवाई सुरू आहे. अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई सातत्याने वाढत असून, बांगलादेशीसोंबतच इतर शहरातील नागरिक देखील बेकायदा पुण्यात वास्तव्य करत असल्याचे दिसून आलेले आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागात तपास मोहीम, कागदपत्र पडताळणी व गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई केली असून मानवी तस्करी आणि देहविक्रीसारख्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. २०२३ मध्ये निर्वासितांमध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या शून्य होती, तर आफ्रिकन देशांतील २ आणि इतर देशांतील १६ नागरिकांचा समावेश होता. २०२४ मध्ये ही संख्या वाढून एक बांगलादेशी, २५ आफ्रिकन देशांतील नागरिक आणि ३१ इतर देशांतील नागरिकांना निर्वासित केले आहे. २०२५ मध्ये मात्र बांगलादेशी नागरिकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून ८१ झाली, तर आफ्रिकन देशांतील ३ आणि इतर देशांतील २० नागरिकांना निर्वासित करण्यात आले. एकूण १०४ जणांवर कारवाई करण्यात आली. बांगलादेशी नागरिकांना पुण्यात वास्तव्य करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी ते बनावट कागदपत्रे बनवत असल्याचे आढळून आले आहे. बांगलादेशी नागरिक त्यांच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट ॲप डाउनलोड करून त्यामाध्यमातून बांगलादेशातील नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवत होते. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या मोबाईलची तपासणी केली जाणार असून, त्यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Previous Post

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

BreakingNews

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.