Lokrakshanay
Thursday, May 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

पार्किंग लॉटच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध; शिवसेना (यूबीटी) मैदान संरक्षणासाठी आक्रमक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 28, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सभोवतालच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकल्पाअंतर्गत नर्दुल्ला टँक मैदानावर पार्किंग लॉट उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मैदान वाचवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक रहिवाशांच्या मते, नर्दुल्ला टँक मैदान हे परिसरातील मुलांसाठी महत्त्वाचे खेळाचे मैदान असून ज्येष्ठ नागरिकांसाठी फेरफटका मारण्याचे प्रमुख ठिकाण आहे. याशिवाय येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. मात्र, पार्किंग लॉटच्या प्रस्तावामुळे ही मोकळी जागा नष्ट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या मुद्द्यावर शिवसेना (यूबीटी) आक्रमक झाली असून मैदान संरक्षणासाठी मोठ्या आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार महेश सावंत यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पाला नसून मैदान ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना आहे. “आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण नागरिकांच्या हक्काच्या मोकळ्या जागा हिरावून घेण्यास विरोध करू. जोपर्यंत शिवसेना अस्तित्वात आहे, तोपर्यंत मैदान ताब्यात घेण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,” असे त्यांनी म्हटले. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थान मानले जात असल्याने सरकारकडून कॉरिडॉर प्रकल्पाला विकास आणि सुविधा वाढवण्याचा भाग म्हणून पाहिले जात आहे. मात्र, दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि ठाकरे गट हा सार्वजनिक मैदान वाचवण्याचा लढा असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हा मुद्दा आता राजकीय रंग घेऊ लागला असून येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

Next Post

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Next Post
१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

BreakingNews

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.