Lokrakshanay
Thursday, July 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे गुन्हे शाखा व शिधावाटप विभागाची संयुक्त कारवाई; चालकासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 25, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारा टँकर जप्त केला. या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ असे लिहिण्यात आले होते. गोपनीय माहितीच्या आधारे मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचून टाटा कंपनीचा टँकर (MH-46-BB-7134) अडवण्यात आला. तपासणीदरम्यान टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. चालकाकडे या पदार्थाच्या वाहतुकीसाठी कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. त्यानंतर शिधावाटप अधिकारी सुभाष रामनाथ डुंबरे आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. संयुक्त तपासणीत टँकरच्या पाच कप्प्यांमध्ये २५ हजार लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळला. जप्त मुद्देमालामध्ये २४.५ लाख रुपयांचे इंधन आणि २२ लाख रुपये किमतीचा टँकर समाविष्ट आहे.

प्राथमिक तपासात आरोपींनी विरार खाडी किनाऱ्यावरून बोटीमार्फत डिझेल आणून ते टँकरमध्ये भरल्याची माहिती समोर आली आहे. हे इंधन नाशिकच्या दिशेने नेण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थ वाहतुकीचे कोणतेही सुरक्षामानदंड न पाळता सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७, रा. वाशी) याला अटक करण्यात आली असून टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग यांच्यासह आणखी सात जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिधावाटप अधिकारी सुभाष रामनाथ डुंबरे यांच्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पिरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उटेकर पुढील तपास करत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सरजेराव मस्के-पाटील यांनी नागरिकांना इंधन साठा करण्याची गरज नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

Previous Post

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

Next Post

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

Next Post
पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

BreakingNews

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!

दुर्गम भागासाठी एसटीच्या २०० मिनी बस; २०३५ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचा सरनाईकांचा निर्णय!

‘तारक मेहता…’ मालिका बंद होणार? सेटवरील बांधकामावर निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा!

वसई-विरारमध्ये पाचव्या दिवशीही ट्रॅक्टरच ठरले जीवनवाहिनी; जलमय रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.