Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 27, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : खांदा कॉलनी परिसरात रेल्वे रूळालगतच्या मोकळ्या जागांवर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे आणि राजकीय कार्यालयांवर सिडकोने शनिवारी (२५ एप्रिल) धडक कारवाई करत सर्व बांधकामे हटवली. या कारवाईत सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या मोक्याच्या भूखंडावरचा ताबा सिडकोने पुन्हा मिळवला असून अतिक्रमण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.पनवेल नोडमधील सेक्टर १०, भूखंड क्रमांक २० व ४५ या ठिकाणी सुमारे २००० चौ.मी. क्षेत्रफळाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती.

सुरुवातीला लहान शेड उभारून त्यानंतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे आणि पुढे त्या ठिकाणी स्थायी धार्मिक स्थळे व कार्यालये उभी करणे, असा अतिक्रमणाचा पद्धतशीर प्रकार सुरू होता. खांदेश्वर आणि नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालील मोकळी जागा अशाच प्रकारे हळूहळू कब्जात घेतली गेली होती.सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसांकडे दुर्लक्ष करूनही बांधकामे कायम ठेवण्यात आल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य बांधकाम नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रक श्रीकांत पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत सिडकोचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या मदतीने सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पुढील अतिक्रमण टाळण्यासाठी संबंधित भूखंडाभोवती तात्काळ कुंपणही घालण्यात आले आहे.सदर बांधकामे सिडकोच्या नियमांचे उल्लंघन करून आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. या कारवाईमुळे परिसरातील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणाविरोधात सिडकोने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून भविष्यातही अशा कारवाया सुरूच राहणार असा इशारा सिडकोने दिला आहे.

Previous Post

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

Next Post

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

Next Post
स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.