Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नाशिकमध्ये ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक

नाशिकमध्ये ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 22, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : एका फायनान्स कंपनीत एजंट असणाऱ्याने क्रेडिट कार्ड धारकांच्या माहितीचा गैरवापर करून त्यांच्या कार्डमार्फत विविध ठिकाणी ‘कॅशलेस’ आर्थिक व्यवहार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. याप्रकरणी ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरातील एकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यान्वये, कमलेश मनसुख खटकाळे (रा. चुंचाळे शिवार) या संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संशयित कॉलेजरोड परिसरात असलेल्या एका फायनान्स कंपनीत एजंट म्हणून कार्यरत आहे. संशयिताने २४ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत फिर्यादी यांसह इतर ४१ जणांची ३३ लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केली. संशयिताने ‘मी फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे. क्रेडिट कार्ड सुरू किंवा बंद करणे, कर्जासंदर्भातील कामे करतो, काही असल्यास कळवा’, असे सांगून अनेकांना हेरले. त्यानंतर क्रेडिट कार्डचे चार्जेस, आर्थिक व्यवहारासंदर्भात तक्रारी घेऊन काही जण त्याच्याकडे गेले. त्यातील ४१ संशयितांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेत त्याने तांत्रिक स्वरुपात विविध ठिकाणी ‘कॅशलेस’ व्यवहार केले. क्रेडिट कार्डच्या व्यवहारांच्या नोंदी वापरकर्त्यांनी बघितल्यावर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संशयिताने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची गोपनीय माहिती घेतली. त्याद्वारे पेट्रोल पंप, मॉल व इतर ठिकाणी त्या क्रेडिट कार्डांच्या क्रमांकावरून व्यवहार करून ‘कॅशलेस’ खरेदी केली. त्यामुळे संशयिताकडून रोख स्वरुपात पैसे वसुल करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर आहे. काही वापरकर्त्यांनी कार्ड बंद करूनही दंड व रक्कम वाढत असल्याने फायनान्स कंपनीत चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला. संशयिताने क्रेडिट कार्डचा वापर कुठे केला, यासह रकमेतून कोणते व्यवहार केले, यासंदर्भात तांत्रिक तपास सुरू आहे. या संदर्भात इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास अशा व्यक्तींनी पुढे येऊन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

Previous Post

‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले’, प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतानाच राज ठाकरेंचं भाष्य

Next Post

पुणे महापालिकेचे खाऊ गल्लीसाठी नवे धोरण

Next Post
पुणे महापालिकेचे खाऊ गल्लीसाठी नवे धोरण

पुणे महापालिकेचे खाऊ गल्लीसाठी नवे धोरण

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.