Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ग्रामीण रुग्णसंख्या तुलनेने भारतात सोरायसिस आजारात वेगाने वाढ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 11, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
ग्रामीण रुग्णसंख्या तुलनेने भारतात सोरायसिस आजारात वेगाने वाढ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : त्वचेवरील लालसर, खरखरीत चट्टे आणि सततचा खाज-यामुळे ओळखला जाणारा सोरायसिस हा आजार भारतात वेगाने वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. भारतीय त्वचारोग सोसायटी आणि इंडियन जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात सोरायसिसचे प्रचलन सुमारे ०.४ टक्के ते २.८ टक्के दरम्यान आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी शहरी भागात, विशेषतः प्रदूषण, मानसिक ताण आणि जीवनशैलीतील बदल यामुळे हा आजार जास्त प्रमाणात दिसतो.

सोरायसिस हा एक ऑटोइम्यून दाहजन्य त्वचारोग असून तो दीर्घकाल टिकणारा आहे. तो केवळ त्वचेवर मर्यादित राहत नाही, तर काही रुग्णांमध्ये सोरियाटिक आर्थ्रायटिस या सांध्यांच्या आजाराचे रूप घेऊ शकतो. इंडियन जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजी (२०२३) च्या आकडेवारीनुसार, सोरायसिस असलेल्या सुमारे २० टक्के ते ३० टक्के रुग्णांमध्ये सांधेदुखीची लक्षणे दिसतात, जी उपचार न झाल्यास कायमस्वरूपी विकृती निर्माण करू शकतात. भारतामध्ये सोरायसिसवरील राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण सर्वेक्षण अद्याप मर्यादित असल्यामुळे नेमकी राज्यनिहाय आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, एम्स, दिल्ली आणि पीजीआयएमइआर चंदीगढच्या रुग्णालयीन अभ्यासानुसार उत्तर भारतात हा आजार सुमारे २.३ टक्के प्रौढांमध्ये आढळतो, तर दक्षिण भारतात हा दर ०.४ टक्के ते १.५ टक्के इतका आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील फरक, आहार पद्धती, आनुवंशिक घटक आणि पर्यावरणीय परिस्थिती यामुळे प्रचलनात भौगोलिक फरक दिसतो.

तज्ज्ञांचे मत एम्स दिल्लीस्या त्वचारोग विभागातील डॉक्टरांच्या मते, भारतामध्ये सोरायसिसवरील जनजागृती अजूनही कमी आहे. रुग्ण लक्षणांकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात आणि उशिरा उपचार घेतात. लवकर निदान आणि सततचा उपचार हा सांध्यांवरील आणि इतर अवयवांवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.आ रोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) अंतर्गत त्वचारोगांच्या नोंदीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे सोरायसिससारख्या दीर्घकालीन आजारांची अचूक आकडेवारी मिळवणे आणि धोरण आखणे सोपे होईल. सोरायसिसवर मात करण्यासाठी केवळ औषधोपचार नव्हे, तर जीवनशैलीतील बदल, मानसिक आरोग्याची काळजी, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि तणाव नियोजन महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे एकमत आहे. भारतातील वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा आजार सार्वजनिक आरोग्याच्या अजेंड्यावर प्राधान्याने असणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Previous Post

अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर परिणाम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Next Post

कबुतरखाना ट्रस्टची महापालिकेकडे विनंती, सकाळी ६ ते ८ या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे

Next Post
कबुतरखाना ट्रस्टची महापालिकेकडे विनंती, सकाळी ६ ते ८ या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे

कबुतरखाना ट्रस्टची महापालिकेकडे विनंती, सकाळी ६ ते ८ या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे

BreakingNews

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.