Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एसटीच्या UPI तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 3, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
एसटीच्या UPI तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार, एसटी महामंडळामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने यूपीआय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत. सप्टेंबर २०२५ महिन्यात एकूण सुमारे ४९.७९ लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून ६४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढत ७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर नोव्हेंबर २०२५ मध्ये यूपीआय व्यवहारांमधून सुमारे ७८.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे. डिसेंबर २०२५ मध्येही हीच वाढती प्रवृत्ती कायम राहिली असून,एकूण सुमारे ६२.५९ लाखांहून अधिक युपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून, त्यातून ८३.६७ कोटी रूपये महसुल जमा झाला आहे.

एसटी महामंडळाने बसस्थानकांवर, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासादरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रोख रकमेचा व सुट्ट्या पैसे ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे. अर्थात, त्यामुळे सुट्ट्या पैशावरुन वाहकांशी होणाऱ्या अनावश्यक वाद-विवादाला पूर्ण विराम मिळाला आहे. याबरोबरच काही वाहकांकडून होणारा पैशाचा अपहार रोखण्यासाठी देखील डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत आहे. येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

Previous Post

२००० नंतर आता मार्च २०२६ पासून ५००च्या नोटा बंद?

Next Post

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री?

Next Post
अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री?

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री?

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.