Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘सखी’ची साथ! ११ व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अवघ्या काही मिनिटांत मिळणार मदत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 9, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘सखी’ची साथ! ११ व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अवघ्या काही मिनिटांत मिळणार मदत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आता लोकलमध्ये प्रवास करताना काही संकट आलं, तर घाबरून जाण्याची गरज नाही. चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सखी’ हा विशेष व्हॉट्सअॅप उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून महिला प्रवासी थेट आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना आता अवघ्या काही मिनिटांत मदत मिळणार आहे.

चर्चगेट ते डहाणू या पट्ट्यात एकूण ११ व्हॉट्सअॅप ग्रूप्स तयार करण्यात आले आहेत. या ग्रूपचे नेतृत्व महिला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक महिला उपनिरीक्षक करत आहेत. महिला प्रवाशाने छेडछाड, चोरी किंवा पुरुषांच्या घुसखोरीबाबत फोटो आणि स्थानकाचे नाव ग्रूपवर टाकल्यास, पुढच्या एक-दोन स्थानकांतच आरपीएफचे जवान मदतीसाठी डब्यात हजर होतील. या उपक्रमात आतापर्यंत १५०० हून अधिक नियमित महिला प्रवासी सहभागी झाल्या आहेत. केवळ तांत्रिक मदतच नाही, तर आरपीएफने प्रत्यक्ष कारवाईचाही बडगा उगारला आहे. गेल्या सहा महिन्यांत महिलांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या ६,१९५ पुरुषांवर रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घुसखोरांकडून तब्बल १३ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. रेल्वेची ‘१३९’ ही हेल्पलाईन सेवा सुरू असली, तरी व्हॉट्सअॅप ग्रूपमुळे फोटो आणि लोकेशन शेअर करणे सोपे झाल्याने गुन्हेगारांना पकडणे अधिक सुलभ होणार आहे.

Previous Post

गिरगाव चौपाटीवर रंगणार कोकणी मेळावा! २४ एप्रिलपासून ‘मँगो फेस्टिव्हल’ आणि ‘प्रॉपर्टी शो’ची मेजवानी

Next Post

“इराणच्या उंबरठ्यावर अमेरिकन सैन्य तैनातच राहणार!” – युद्धविरामानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा

Next Post
“इराणच्या उंबरठ्यावर अमेरिकन सैन्य तैनातच राहणार!” – युद्धविरामानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा

“इराणच्या उंबरठ्यावर अमेरिकन सैन्य तैनातच राहणार!” - युद्धविरामानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा

BreakingNews

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

रस्त्यावर थुंकल्यास आता मोजावे लागणार तब्बल २००० रुपये; हायकोर्टाची BMCला सक्त ताकीद

ट्रॅफिकमधून सुटका! वर्षाअखेरीस ठाणे-भिवंडी मेट्रो ५ चा पहिला टप्पा सुरू होणार

भेसळखोरांवर FDAचा डिजिटल बडगा; एआय-आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू!

आता Swiggy Instamart वरून LPG सिलिंडरही मिळणार घरपोच; HPCL सोबत भागीदारी

ठाण्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.