Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेस्टला NO ENTRY! ई- बसच्या वाढीव तिकीट दरामुळे पर्यटकांचे बजेट कोलमडले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 20, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेस्टला NO ENTRY! ई- बसच्या वाढीव तिकीट दरामुळे पर्यटकांचे बजेट कोलमडले
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेस्ट बस सेवा बंद केल्यानंतर आता उद्यान प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी तेथे ई बस सेवा सुरू केली आहे. मात्र, या गाड्यांच्या तिकीट दरावर अनेकांनी आक्षेप घेतला असून प्रशासनाच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. दरम्यान, तिकिटांच्या विक्रीतून जमा होणाऱ्या महसुलातून देखभाल – दुरुस्ती केली जाते. ही बाब लक्षात घेऊन बसचे दर निश्चित करण्यात आल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ई-बसच्या वाढीव तिकीट दरामुळे पर्यटक, तर बसमधून प्रवास करण्यास मनाई असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई उच्च न्यायालय आणि उच्चाधिकार समितीच्या आदेशानुसार पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी बेस्ट उपक्रमाने बोरिवली स्थानक ते कान्हेरी गुंफादरम्यान धावणारी वातानुकूलित बेस्ट बस सेवा १७ जानेवारीपासून पूर्णत: बंद केली. पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या बसमार्गाचे प्रवर्तन बंद करण्यात आले. त्यांनतर कान्हेरी गुंफा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशासनाने पाच ई – बसगाड्या सुरू केल्या. ही सेवा केवळ पर्यटकांसाठी असल्याने तेथील स्थानिकांना पायपीट करत घर गाठावे लागते. संबंधित बस राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर चालविण्यात येत असून बसगाड्यांचे तिकीट दर प्रति प्रवासी १०० रुपये इतके आहे. राष्ट्रीय उद्यानात बेस्ट बस चालवू नयेत, याबाबत न्यायालयाने मे १९९७ मध्येच आदेश दिले आहेत, असा दावा राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने केला. मात्र, त्यानंतरही बेस्ट बसची सेवा सुरूच होती. बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) आणि कान्हेरी गुफादरम्यान वातानुकूलित बसमार्ग क्रमांक ए-१८८ सुरू होती. जानेवारीमध्ये ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. बेस्ट बसमधून प्रवासासाठी साधारणपणे १५ ते २० रुपयांदरम्यान तिकीट दर होता. मात्र, आता प्रशासनाच्या ई बसचे दर प्रति व्यक्ती १०० रुपये असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाडेवाढीमुळे पर्यटक संख्या कमी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

Previous Post

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले

Next Post

सावधान! कल्याणमध्ये एटीएम कार्ड बदलणारी टोळी सक्रिय; मदतीच्या बहाण्याने तिघांना लावला लाखांचा चुना

Next Post
सावधान! कल्याणमध्ये एटीएम कार्ड बदलणारी टोळी सक्रिय; मदतीच्या बहाण्याने तिघांना लावला लाखांचा चुना

सावधान! कल्याणमध्ये एटीएम कार्ड बदलणारी टोळी सक्रिय; मदतीच्या बहाण्याने तिघांना लावला लाखांचा चुना

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.