Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

सावधान! कल्याणमध्ये एटीएम कार्ड बदलणारी टोळी सक्रिय; मदतीच्या बहाण्याने तिघांना लावला लाखांचा चुना

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 20, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
सावधान! कल्याणमध्ये एटीएम कार्ड बदलणारी टोळी सक्रिय; मदतीच्या बहाण्याने तिघांना लावला लाखांचा चुना
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण पूर्वेत पुना लिंक रस्त्यावरील सलगर शाॅप सेंटरमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून, खडेगोळवली येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना चार भामट्यांनी तीन ग्राहकाची फसवणूक केली आहे. ग्राहक म्हणून या एटीएममध्ये घुसून पैसे काढत असलेल्या तीन ग्राहकांची एटीएम कार्डच्या माध्यमातून एक लाख ८६ हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या ग्राहकाने तक्रार केली आहे. नंदकिशोर रमेश पाटील, वैभव प्रकाश आव्हाळे, यशवंत हिरामण मगरे अशी फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांची नावे आहेत. या प्रकारामुळे कल्याण पूर्व भागात फसवणूक करणाऱ्यांची एक टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. कल्याण पूर्व भागातील पुना लिंक रस्त्यावरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून नंदकिशोर पाटील आणि वैभव ओव्हाळ पैसे काढत होते. यावेळी एटीएम केंद्रात अन्य चार जण ग्राहक म्हणून आले. त्यांनी एटीएममधून पैसे काढणाऱ्या तक्रारदार ग्राहकांची एटीएम कार्ड लबाडीने एटीएम केंद्रातील खाच्यात अडकून ठेवली. संबंधित ग्राहकांना पैसे काढता येणार नाही अशी व्यवस्था केली.

ही अडकलेली एटीएम कार्ड बाहेर काढण्यासाठी चार भामट्यांनी ग्राहकांना आम्ही तुमची एटीएमच्या खाच्यात अडकलेली एटीएम कार्ड बाहेर काढून देतो. तुमच्या कार्डचा गुप्त संकेतांक काय आहे हे विचारून घेतले. त्यानंतर या भामट्यांनी त्या गुप्त संकेतांकाच्या साहाय्याने हात चलाखी करून रक्कम काढून घेतली. ही रक्कम काढून ते पसार झाले. आपल्या बँक खात्यामधून भामट्यांनी आपल्या एटीएम कार्डचा वापर करून रक्कम लबाडीने काढून घेतल्याची बाब दोन ग्राहकांच्या उशिराने लक्षात आली. त्यानंतर या भामट्यांनी कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात स्टेट बँकेच्या एटीएममध्ये जाऊन पुना लिंक रोड भागातील एटीएममध्ये केलेला प्रकार केला. तेथे यशवंत हिरामण मगरे हे स्टेट बँक एटीएमधून संध्याकाळच्या वेळेत पैसे काढून घेत होते. त्यावेळी चार भामटे आले. त्यांनी हात चलाखी करून यशवंत यांचे एटीएम कार्ड एटीएम केंद्राच्या खाच्यात अडकून टाकले. ते बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून गुप्त संकेतांक मिळवला. या संकेतांकाचा वापर करून भामट्यांनी यशवंत यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. अशी एकूण एक लाख ८६ हजार रूपयांची रक्कम काढून घेऊन चारही भामटे पसार झाले. या फसवणूक प्रकरणी नंदकिशोर पाटील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सापटे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेस्टला NO ENTRY! ई- बसच्या वाढीव तिकीट दरामुळे पर्यटकांचे बजेट कोलमडले

Next Post

UPI पेमेंट आता केवळ एका टचवर! फिंगरप्रिंट लावून करा सुपरफास्ट पेमेंट

Next Post
UPI पेमेंट आता केवळ एका टचवर! फिंगरप्रिंट लावून करा सुपरफास्ट पेमेंट

UPI पेमेंट आता केवळ एका टचवर! फिंगरप्रिंट लावून करा सुपरफास्ट पेमेंट

BreakingNews

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.