Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

पर्यावरणवाद्यांचा अर्ज स्वीकारल्याने मंदीराच्या अडचणी वाढल्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 30, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नवी मुंबईतील उलवेतील तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासाठी दिलेल्या सीआरझेड मंजुरीला आव्हान देणारा शहरस्थित पर्यावरणवाद्यांचा अर्ज अखेर स्वीकारला आहे. एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठाचे न्यायिक सदस्य म्हणून न्यायमूर्ती दिनेश कुमार आणि तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. विजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी आता केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला चार आठवड्यांत उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. एनजीटीत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी असा युक्तिवाद केला की, १० एकर भूखंडांचे वाटप आणि सीआरझेड प्राधिकरणाने दिलेली मंजुरी बेकायदेशीर आहे. कारण जमीन मंदिराचा भूखंड सीआरझेड-१ मध्ये मोडतो. तरीही महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने चुकीच्या पद्धतीने सीआरझेड मंजुरी दिली आहे. वास्तविक त्यासाठी केंद्रे वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने भूखंडाच्या सीआरझेड नसलेल्या भागात बांधकामाला परवानगी दिली असली तरी सीआरझेड-१ क्षेत्राच्या ५० मीटर खारफुटीच्या बफर झोनमध्येही कंपाउंड वॉल आणि लॉनला परवानगी दिल्याने नॅटकनेक्टने त्याला विरोध केला आहे. यावर कुमार यांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांच्या युक्तिवादाची दखल घेऊन एनजीटी खंडपीठाने अर्ज स्वीकारून पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी ठेवली आहे. यावेळी एनजीटी खंडपीठाने भट्टाचार्य यांना एमसीझेडएमए प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला, तर तिरुमाला तिरुपती देवस्थानचे वकील सत्य सभरवाल यांना या खटल्यात त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये या मंदिराचे भूमिपूजन केले होते.

Previous Post

राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

Next Post

मालमत्ता करा इतका दंड आकारण्याचा इशारा देताच दुकानांवर झळकले मराठीत नामफलक

Next Post
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत

मालमत्ता करा इतका दंड आकारण्याचा इशारा देताच दुकानांवर झळकले मराठीत नामफलक

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.