Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सॅल्सबरी पार्क परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा; आणखी एक दहशतवादी पुण्यातून ताब्यात

आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाॅम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 18, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
सॅल्सबरी पार्क परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा; आणखी एक दहशतवादी पुण्यातून ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सॅल्सबरी पार्क परिसरात छापा टाकला. एनआयएच्या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने पुण्यातील सॅल्सबरी पार्क परिसरात सोमवारी कारवाई करुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल संच जप्त करण्यात आला. दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.

यापूर्वी याप्रकरणात मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) यांना अटक करण्यात आली होती.

Previous Post

राज्यभरात दरोडा व घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

Next Post

९ कोटी रुपयांची कस्टम अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Next Post
९ कोटी रुपयांची कस्टम अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

९ कोटी रुपयांची कस्टम अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.