BMC | मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता होत असताना आता संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानाला मंगळवार पासून म्हणजे 9 ऑगस्ट, 2023 सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालयातील प्रांगणात महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी महापालिकेच्या प्रांगणा त ध्वजारोहण देखील करण्यात आले अशाच प्रकारचे कार्यक्रम के पूर्व प्रभागात 14 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार पासून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सगळ्याला सुरुवात झाली आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राज्यासह संपूर्ण देशभरात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत, ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर मनीष वाळुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘के’ पूर्व प्रभाग कार्यालय हद्दीतील विविध ठिकाणी झेंडावंदनासह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांचे प्रति ऋण व्यक्त करण्यासोबतच देशाला प्रगतिशील बनवण्याच्या कार्यात योगदान देण्यासाठी प्रतिबंध राहण्याची शपथ नागरिकांना देखील दिली जाणार आहे.