Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धाराशीव मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ५८८ अर्ज ; २६ हजार मतदारांचे तिसऱ्या टप्प्यात ‘गृहमतदान’

राज्यात आगामी तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघासाठी २६ हजार २११ मतदारांनी नोंदणी केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 2, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
परिवहन विभागाकडून तपासणी सुरू; पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदापासून प्रथमच ८५ वर्षांवरील, आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाचा (घरातून पोस्टल मतदान करण्याची मुभा) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत राज्यात आगामी तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघासाठी २६ हजार २११ मतदारांनी नोंदणी केली आहे. यात प्रामुख्याने धाराशीव (उस्मानाबाद) मतदारसंघामध्ये सर्वाधिक चार हजार ५८८, तर सर्वांत कमी बारामती मतदारसंघासाठी फक्त ४३१ गृहमतदारांनी नोंदणी केली असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली. राज्यात तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील दोन, पश्चिम महाराष्ट्र सात, कोकणातील दोन अशा एकूण ११ मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये २५८ उमेदवार रिंगणात असून, यात सर्वाधिक ३८ उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत. त्यानंतर माढा मतदारसंघात ३२, तर धाराशीव मतदारसंघात ३१ उमेदवार अंतिम यादीत असल्याचे सांगण्यात येते.

तिसऱ्या टप्प्यात मतदानासाठी एकूण दोन कोटी नऊ लाख ९२ हजार ६१६ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात एक कोटी सात लाख ६४ हजार ७४१ पुरुष, आणि एक कोटी दोन लाख २६ हजार ९४६ महिला आणि ९२९ तृतीयापंथी मतदार आहेत. यात गृहमतदानासाठी २६ हजार २११ जणांनी १२ डी हा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे. त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याची माहिती आयोगातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १४ हजार ६१२ जणांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते. त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघातून सर्वाधिक दोन हजार ९९२ आणि अकोला मतदारसंघातून दोन हजार ६६७ मतदारांचा समावेश होता. गेल्या काही निवडणुकांची टक्केवारी लक्षात घेता बहुतांश वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानासाठी केंद्रावर जात नसल्याची बाब आयोगाच्या निदर्शानस आली आहे. त्यामुळेच यंदापासून हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटत आहे.

गृहमतदानासाठी मतदारसंघनिहाय अर्ज
रायगड ३,१४६
बारामती ४३१
धाराशीव (उस्मानाबाद) ४,५८८
लातूर २,५६६
सोलापूर २,०५२
माढा २,३४६
सांगली १,८५९
सातारा १,२७२
रत्नागिरी-सिंधुदुर्ग ३,७२६
कोल्हापूर ३,१०३
हातकणंगले १,१२२
एकूण २६,२११

Previous Post

कल्याण पूर्वेत दारूचा साठा जप्त; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर दारूची आवक वाढली

Next Post

कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकासह चौघांना अटक; एक लाखांचा दंड

Next Post
कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकासह चौघांना अटक; एक लाखांचा दंड

कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकासह चौघांना अटक; एक लाखांचा दंड

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.