Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकासह चौघांना अटक; एक लाखांचा दंड

कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा दारू विक्रीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना न घेता दारू विक्री प्रकरणात ढाबाचालकासह चौघांना अटक करण्यात आली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 3, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकासह चौघांना अटक; एक लाखांचा दंड
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कोथरूडमधील ढाब्यावर बेकायदा दारू विक्रीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना न घेता दारू विक्री प्रकरणात ढाबाचालकासह चौघांना अटक करण्यात आली. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालायाने ढाबाचालकाला एक लाख रुपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. राज्य उत्पादन शुल्क ‘सी ‘ विभागाच्या पथकाने कोथरूड येथील हॉटेल खिंड या ढाब्यावर नुकताच छापा टाकला. ढाबा चालक योगेश सुरेश माथवड याने ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याचे आढळून आले. त्यानंतर माथवड यांच्यासह चार ग्राहकांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम, दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदीप लोहकरे, उज्ज्वला भाबड, शरद भोर, गोपाळ कानडे, सचिन इंदलकर यांनी ही कारवाई केली.

लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदा मद्य विक्री, तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात आली असून, ढाबा, हॉटेलची अचानकपणे तपासणी सुरू करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध या पुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निरीक्षक एस. एस. कदम यांनी दिला आहे.

Previous Post

धाराशीव मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ५८८ अर्ज ; २६ हजार मतदारांचे तिसऱ्या टप्प्यात ‘गृहमतदान’

Next Post

शनिवारपासून गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण सुरू होणार

Next Post
होळी विशेष मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या रेल्वेगाड्या

शनिवारपासून गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण सुरू होणार

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.