Lokrakshanay
Tuesday, June 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कल्याण पूर्वेत दारूचा साठा जप्त; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर दारूची आवक वाढली

गेल्या महिनाभराच्या कालावधीत डोंबिवली, कल्याण शहरांच्या विविध भागात कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून लाखो रूपयांची दारू जप्त केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 2, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
कल्याण पूर्वेत दारूचा साठा जप्त; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर दारूची आवक वाढली
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या महिनाभराच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरात चोरट्या मार्गाने आणलेल्या दारूची आवक वाढली आहे. चाळी, झोपडपट्यांमध्ये या दारूचा सर्वाधिक वापर काही राजकीय मंडळींकडून मतांसाठी केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत डोंबिवली, कल्याण शहरांच्या विविध भागात कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून लाखो रूपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन होता. या दिवशी दारू विक्रीवर बंदी होती. तरीही कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात दारूचा चोरट्या मार्गाने साठा आणून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती.

गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांंना हवालदार भोसले यांनी ही माहिती दिली. पवार यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे हवालदार गुरुनाथ जरग, दत्ताराम भोसले, दीपक महाजन, गोरक्ष रोकडे, विश्वास माने कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात पाळत ठेवली. त्यावेळी भोसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तिसगाव भागातील विजयनगर नाक्या जवळ दारू विक्री सुरू असल्याचे समजले. सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी तातडीने आपला मोर्चा विजयनगर नाक्याजवळ वळविला. तेथे कैलास काशिनाथ कुऱ्हाडे (४५, रा. जनाबाई निवास चाळ, तिसगाव) हा या भागात चोरून दारू विकत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या माहितीची खात्री करून कैलास कुऱ्हाडेच्या घरात छापा मारला. त्यावेळी तेथे देशी, विदेशी दारूच्या २०० हून अधिक बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दहा हजाराहून अधिक किमतीची दारू जप्त केली. पोलिसांनी कैलासला अटक करून त्याच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता कोळसेवाडी पोलीस कैलासची चौकशी करत आहेत. ही दारू त्याने कोठुन आणली आणि तो ती कोणाला देणार होता. कोणाच्या सांंगण्यावरून त्यांनी हा बेकायदा दारूसाठा ताब्यात बाळगला अशा विविध माध्यमातून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दारू साठ्यामागे काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे.

Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये आढळली चाळीस लाखांची रोकड

Next Post

धाराशीव मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ५८८ अर्ज ; २६ हजार मतदारांचे तिसऱ्या टप्प्यात ‘गृहमतदान’

Next Post
परिवहन विभागाकडून तपासणी सुरू; पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने

धाराशीव मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ५८८ अर्ज ; २६ हजार मतदारांचे तिसऱ्या टप्प्यात 'गृहमतदान'

BreakingNews

‘देऊळ बंद २’चा नफा शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडेंचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबईत मराठी नामफलक मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१२४ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई!

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.