Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 27, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र, मुंबई
महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास पोहोचला असून त्याच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी १ मेची तारीख निश्चित केली आहे. खोपोली येथील बोगद्यात हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या नव्या मार्गिकेमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद होणार असून प्रवाशांचा सुमारे ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवाशांसाठी तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

मुंबई–पुणे मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली ते कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीची ही नवीन मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र विविध अडचणींमुळे त्यास विलंब झाला. विशेषतः आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याने अंतिम टप्प्यात काम ठप्प होण्याची वेळ आली होती. तरीही मागील काही महिन्यांत कामाला गती देत एप्रिल २०२६ अखेर प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले. सर्व तांत्रिक आणि वजन चाचण्या यशस्वी झाल्याने आता ही मार्गिका वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. या प्रकल्पामुळे महामार्गावरील सुरक्षितता वाढण्याबरोबरच वाहतुकीचा वेगही लक्षणीयरीत्या सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

Next Post

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Next Post
१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.