Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

तपासण्या, औषधे, कृत्रिम अवयव व लसीकरण सेवा उपलब्ध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 25, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून समाजातील वंचित घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना आणखी बळ देत सारसबागेजवळील हिराबाग कोठी परिसरात मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शिक्षण, सामाजिक कार्य आणि आरोग्य या क्षेत्रांत सातत्याने काम करणाऱ्या ट्रस्टने गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या केंद्रात विविध वैद्यकीय तपासण्या, आवश्यक औषधे, श्रवणयंत्रे तसेच कृत्रिम अवयव मोफत देण्यात येणार आहेत. आर्थिक अडचणींमुळे उपचार अपूर्ण राहू नयेत आणि प्रत्येकाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रामध्ये रक्त तपासण्या, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल ओपीडी, ईसीजीद्वारे हृदय तपासणी, दंत तपासणी व दात काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय लहान मुलांसाठी लसीकरण, श्रवण तपासणी तसेच कृत्रिम हात-पाय वाटपासाठी नोंदणी यांसारख्या सेवाही येथे दिल्या जाणार आहेत. सर्व सेवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुरवल्या जाणार असून अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१५१६५१७ किंवा ९९२३५१६५१७ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.

Previous Post

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

Next Post

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

Next Post
महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.