Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाइफ सेव्हिंग हेलिकॉप्टर : आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांतून गर्भवती महिलेचा जीव बचावला

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची प्रसूती नुकतीच झाली. प्रसूती वेळी रक्तस्त्राव झाला. या महिलेचे प्राण वाचवण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले. सध्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. या महिलेचे प्राण धोक्यात आले. तिला अशा स्थितीत तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न करणे सुद्धा धोक्याचे ठरू शकतात हे वेळीच ओळखण्यात आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
लाइफ सेव्हिंग हेलिकॉप्टर : आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांतून गर्भवती महिलेचा जीव बचावला
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा तर वाजले नाहीत ना? अशा अनेक घटनांची एकामागून एक मालिका सुरू झाली. दुर्गम आणि ग्रामीण भागात साध्या आरोग्य सुविधा ही मिळत नसल्याचे या घटनांमधून उघड झाले. आताच दोन मुलं कसल्या तरी आजारामुळे आई-वडिलांनी गमावल्याचे समोर आले. त्यापूर्वी पण आई-वडिलांना झोळी करुन तर कधी खाटेवर खासगी रुग्णालयात नेल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. पण आता या बातमीने आरोग्य यंत्रणांची संवेदनशीलता समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर विरोधकांपासून माध्यमातून ताशेरे ओढण्यात येत होते. नुकताच दोन मुलांचा जीव गेला. आई-वडिलांना 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. या दोघांसाठी साध्या वाहनाची सोय सुद्धा करता आली नाही. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांचे हृदय हेलावले. यंत्रणेवर खूप टीका झाली. त्यापूर्वी एका तरुणाचे वडील शेतात पडल्यावर त्यांना उपचारासाठी झोळीत आणि पुढे नदीला महापूर आल्याने नावेतून नेण्यात आले. एका मागून एक अशा घटनांनी आरोग्य यंत्रणेचे आरोग्य तर बिघडले नाही ना? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात येत होता.

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची प्रसूती नुकतीच झाली. प्रसूती वेळी रक्तस्त्राव झाला. या महिलेचे प्राण वाचवण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले. सध्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. या महिलेचे प्राण धोक्यात आले. तिला अशा स्थितीत तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न करणे सुद्धा धोक्याचे ठरू शकतात हे वेळीच ओळखण्यात आले. अशा परिस्थितीत काय करावे यासाठी वेळ खर्ची घालण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने झटपट चक्रे फिरवली. या गर्भवती महिलेचे प्राण वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरने रक्त युनिट भामरागडला रवाना करण्यात आले. अख्ख्या जिल्हा प्रशासनाने या महिलेसाठी धावपळ केल्याचे दिसले. आरेवाडा येथील मातोश्री चौधरी नामक गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यामुळे रक्त कमी असल्याने हेलिकॉप्टरने या महिलेसाठी रक्त पाठविण्यात आले. प्रसूतीच्या वेळी रक्तस्त्राव होत असल्यामुळे आपात्कालीन स्थितीत या महिलेला रक्ताची अति आवश्यकता होती. हेलिकॉप्टरने रक्त पाठवणे अधिक सोपे आणि जलद असल्याने त्यादृष्टीने झटपट निर्णय घेण्यात आला. आरोग्य केंद्राच्या आवारातच हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. तिथून तातडीने रक्त असलेले युनिट रक्त घेऊन पोहचले. या महिलेची प्रसूती झाली असून बाळ व माता सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती प्रशासना दिली. सध्या या भागात पूर परिस्थिती असून मार्ग अनेक बंद पडल्यामुळे हेलिकॉप्टरने हा रक्त युनिट पाठवण्यात आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे कौतुक करण्यात येत आहे.

Previous Post

पुणे-नागपूर प्रवासाचा कायापालट करणारा क्रांतिकारी समृद्धी महामार्ग प्रकल्प

Next Post

पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज; विसर्जन सोहळ्यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

Next Post
पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज; विसर्जन सोहळ्यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज; विसर्जन सोहळ्यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.