डोंबिवली : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महायुतीचे उमेदवार बहुमतांनी विजयी झाले. दरम्यान या सगळ्या निकालावर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभरात महायुतीच्या विजयावर विरोधकांकडून मतमोजणीवर संशय उपस्थित केला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या उमेदवाराने घेतलेल्या निर्णयामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. डाेंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे बहुमताने विजयी झाले. या निकालावर विरोध दर्शवत ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे मतमोजणीवर शंका उपस्थित केली आहे. निवडणूकीत डोबिवलीतून म्हात्रे यांचा पराभव झाला. हा पराभव ईव्हीएम मशीनमुळे भोंगळ कारभारामुळे झाला आहे, असा गंभीर आरोप दिपेश म्हात्रे यांनी केला आहे. प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार चव्हाण यांना मिळालेली मते आणि मताधिक्य याविषयी म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशीचं आवाहन केलं आहे. व्हीव्ही पॅट मशीनमधील मतं मोजण्याकरीता म्हात्रे यांनी निवडणूक यंत्रणेकडे तब्बल ४ लाख ७२ हजार रुपये भरले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणेच दरम्यान राज्यभरात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या विषयी महाविकास आघाडीने शंका घेत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. या आरोपापश्चात उद्धव सेनेकडून डोंबिवलीत आज विविध ठिकाणी बूथ लावण्यात आले आहे. त्याठिकाणी ईव्हीएम मशीनच्या विरोधात नागरीकांची स्वाक्षरी मोहीम घेतली जात आहे.
विधानसभा निवडणूकीच्या या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अतीतटीटची लढत पाहायला मिळाली होती. या निवडणूकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि इतर पक्ष होते. इतक्या मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून आलेच कले असा सवाल उपस्थित केला जात आहे. निकालावर नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.