Lokrakshanay
Friday, July 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कोपरखैरणेचा ‘हिरा’ चमकला! विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंडर-१९ विश्वविजेता अभिज्ञान कुंडूचा नवी मुंबई महासभेत गौरव

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 23, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
कोपरखैरणेचा ‘हिरा’ चमकला!  विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंडर-१९ विश्वविजेता अभिज्ञान कुंडूचा नवी मुंबई महासभेत गौरव
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : अभिज्ञान अभिषेक कुंडू या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधाराचा नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे गौरव करण्यात आला. शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते सभागृहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे प्रशिक्षक चेतन जाधव यांनाही सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन महापौरांनी यावेळी केली.

फेब्रुवारी २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पार पडलेल्या आयसीसीच्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना कुंडू यांनी चार अर्धशतके झळकावून एकूण २३९ धावा केल्या. संघातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्यांची नोंद झाली. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताने विजय मिळवत विश्वचषक जिंकला, त्यात कुंडू यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. महासभेत उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे व उपसभापती राजू मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावास विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी आपल्या मनोगतातून कुंडू यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

ठाणेनगरीत रामजन्माचा उत्साह! रामनवमीला ‘संगीत रामायण (हिंदी)’ चे विशेष आयोजन

Next Post

सिलिंडरमधून ४ किलो गॅस ‘गायब’ होणार? केवळ ८ ते १० किलो गॅस भरण्याचे कंपन्यांना केंद्राचे आदेश

Next Post
सिलिंडरमधून ४ किलो गॅस ‘गायब’ होणार? केवळ ८ ते १० किलो गॅस भरण्याचे कंपन्यांना केंद्राचे आदेश

सिलिंडरमधून ४ किलो गॅस 'गायब' होणार? केवळ ८ ते १० किलो गॅस भरण्याचे कंपन्यांना केंद्राचे आदेश

BreakingNews

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

पावसाचा रेड-ऑरेंज अलर्ट फक्त कागदावरच? मुसळधार पावसातही रेनकोट-छत्रीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती!

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.