Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई करण्यात आली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 20, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, नाशिक
सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत व परिसरात मार्शलची नेमणूक करावी , तसेच शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तानसा पाईप लाईन परिसर, उपवन तलाव परिसरात कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावावेत, तसेच सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून दोन वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई करण्यात आली. उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिर, ते उपवन तलाव परिसर, बनारस घट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी (दुभाजक), येऊर फॉरेस्ट ते रिक्षास्टॅण्ड, वर्तकनगर नाका (तानसा), वसंतविहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते एचडीएफसी बँक आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवणेबाबतची शपथ घेतली.तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणा-या झिरो डंपिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.

रस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांना दंड लावावा जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत तसेच उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल्य टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहनचा थांबा रस्ता रूंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता मात्र तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत, त्यामुळे हा थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली, याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

Previous Post

१३५ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई

Next Post

ससूनमधील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याने, वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली

Next Post
ससूनमधील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याने, वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली

ससूनमधील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याने, वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.