Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ससूनमधील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याने, वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली

देशात उष्णतेची लाट पसरली असून नवी मुंबईचा पारादेखील ४० अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 20, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
ससूनमधील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याने, वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी अखेर कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची बदली करण्यात आली असून, तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. सागर दिलीप रेणुसे (वय ३०) या रुग्णाला १ एप्रिलला अतिदक्षता विभागात उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्याच रात्री रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात २ एप्रिलला करण्यात आले. त्यात मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी केली. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सादर केला होता.

डॉ. म्हैसेकर यांनी या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी कारवाईचे पाऊल उचलले. या प्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तत्काळ पदावरून हटविण्यात आले आहे. याचबरोबर तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना यावर उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही राज्य सरकारकडे करण्य़ात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

Next Post

बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या विभागाने घेतले ताब्यात

Next Post
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या विभागाने घेतले ताब्यात

बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या विभागाने घेतले ताब्यात

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.