Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१३५ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई

केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 20, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अंदाजित १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास आणि कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुंबई पथकाने कान्हूर मेसाई तालुका शिरुर, जि.पुणे याठिकाणी एका संशयित वाहनाला अडवून त्यातील साहित्याची बारकाईने तपासणी केल्यावर संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळून आली. याचा पाठपुरावा करताना एक गुप्त युनिट मिडगुलवाडी, (जिल्हा, पुणे) येथे सापडले. याची तपासणी करताना त्या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अल्प्राझोलमचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले. या गुप्त प्रयोगशाळेत अत्याधुनिक गोष्टी होत्या, यामध्ये उपकरणे, जनरेटर, ड्रायर इत्यादी साहित्य आढळून आले. पुढील एका कारवाईत नारायणगाव जवळ, ता.आंबेगाव, जि. पुणे येथे २५.९५ किलो अल्प्राझोलम कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासोबत आणखी एक गुप्त उत्पादन युनिट आढळून आले. दोन्ही युनिट हे दुर्गम भागात जेथे वाहनाने पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी होते. याबाबतच्या सविस्तर तपासात असे आढळून आले की या दोन्ही ठिकाणी अंमलीपदार्थाचा (ड्रग्ज) पुरवठा करणाऱ्या एकाच समूहाद्वारे या गुप्त लॅब चालवल्या जात होत्या. तसेच मंचर येथे ताडीचे दुकान चालवणारा एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अल्प्राझोलमची विक्री करताना त्याला अटक करण्यात आली. पुणे येथून या सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्वाच्या सूत्रधाराची माहिती मिळाली, त्याला त्याच्या एका साथीदारासह मिरारोड, ठाणे येथून अटक करण्यात आली. या तपास प्रक्रियेत सबळ माहिती आणि आक्षेपार्हय पुरावे सापडले आहेत. अवैध उत्पादित अल्प्राझोलम महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः अवैधरित्या ताडी तयार करण्यासाठी विकले जात होते. अल्प्राझोलमचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याची एक मोठी बाजारपेठ आणि समाजाच्या निम्न स्तरातील ग्राहक वर्ग याच्याकडून याची खरेदी होते.

Previous Post

पिण्याच्या पाण्यात नाल्याचे पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next Post

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

Next Post
सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून बीट मार्शल नेमावेत, सौरभ राव यांचे निर्देश

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.