नवी दिल्ली प्रतिनिधी : लिमा येथे २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ सोमवारी रवाना झाला. ही स्पर्धा रायफल, पिस्तूल व शॉर्टगनमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे ४० नेमबाज, १४ प्रशिक्षक व ५ अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे.
मागील वर्षी दक्षिण कोरिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताने ५ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्य पदकांची कमाई करताना दुसरे स्थान राखले होते. या स्पर्धेत चीन संघाने २८ पदकांसह पहिले स्थान मिळविले होते. त्यामुळे या स्पर्धेत पदकांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय नेमबाज प्रयत्नशील असतील.
या पथकात अभिनव शॉ, गौतमी भानोत, पार्थ राकेश माने, शांभवी क्षीरसागर, विभूती भाटिया, शार्दुल विहान, सबीरा हारिस, भव्य त्रिपाठी, हरमेहर सिंग लाली आणि भावतेघ सिंग गिल यांचा समावेश आहे. मुकेश नेलावल्ली पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल या दोन प्रकारांत सहभागी होणार आहे.