मनोरंजन : गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना घरात अरबाज-निक्कीच्या प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’च्या घरात अरबाज आणि निक्कीला एकमेकांचा आधार होता. जेव्हा अरबाज घराबाहेर जाणार हे जाहीर झालं, तेव्हा निक्की ढसाढसा रडू लागली होती. तिची अगदी वाईट अवस्था झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या सगळीकडे निक्की आणि अरबाज यांचीच चर्चा असल्याचं दिसून येत आहे.
सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री योगिता चव्हाणचा पती आणि मराठी अभिनेता सौरभ चौघुले हा निक्कीची नक्कल करताना पाहायला मिळाला. योगिता चव्हाणने सौरभचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहलं, ‘भाऊच्या धक्क्यानंतर झालेले परिणाम’. या व्हिडीओमध्ये सौरभ हा निक्कीसारखं रडताना दिसतोय. ‘कुठे गेला तू अरबाज, मी कशी जगू’ असे म्हणत तिची नक्कल करताना तो पाहायला मिळाला.