RAISINS : निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या भरपूर स्वादिष्ट तर आहेतच पण त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे. मनुके हे त्यापैकीच एक आहेत जे दिवसभरात कधीही तुम्ही खाऊ शकतात. मनुके हे सुपरफूड आहेत. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. काय आहेत त्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊयात..
मनुका खाण्याचे ४ फायदे :
१ – मनुका हा अघुलनशील आहारातील फायबरने समृद्ध आहे. ज्यामुळे ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. १०० ग्रॅम मनुक्यात ३०१ किलो कॅलरी ऊर्जा मिळू शकते. यामध्ये पाण्याचे प्रमाण 14.9 ग्रॅम आहे.
२ – ज्या व्यक्तींना हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे आहे त्यांनी मनुक्याचे सेवन करावे. मनुक्यामुळे शरीरावरील मांस वाढण्यास मदत होते. मनुक्यात फ्रक्टोज आणि ग्लुकोज भरपूर असतात, जे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. बॅड कोलेस्ट्रॉल कमी न वाढवता मनुके वजन वाढवण्यास मदत करतात.
३ – तणाव किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे जर रक्तदाबात चढ-उतार होत असेल तर अशा परिस्थितीत मनुका खाल्ल्यास तुम्हाला मदत होऊ शकते.
४ – रोज काळे मनुके खाल्ल्याने तुमचे हाडे मजबूत होऊ शकतात. मनुक्यात असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि पॉलीफेनॉल हे पोषक घटक हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
५ – ज्यांना डांग्या खोकल्याचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी काळे मनुके हे रामबाण उपाय आहे. काळ्या मनुक्यात तापमानवाढीचा प्रभाव असतो ज्यामुळे संसर्ग कमी करून खोकला बरा होण्यास मदत होते.