Lokrakshanay
Wednesday, June 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

“राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू”, सासरच्या धमकीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 11, 2025
in गुन्हेगारी, पुणे
“राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू”, सासरच्या धमकीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राखी पौर्णिमेला भावाला बोलविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. तरुणीचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्नेहा विशाल झेंडगे (वय २७, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. याबाबत स्नेहा यांचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावण्यात आला. पैशांसाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, तसेच मारहाण केली होता. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.

छळ असह्य झाल्याने स्नेहाने पतीसह नातेवाईकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, सासरे संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही स्नेहाचा छळ सुरू होता. राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. छळ असह्य झाल्याने स्नेहाने शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आतम्हत्या केली, असे स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Previous Post

कबुतरखाना ट्रस्टची महापालिकेकडे विनंती, सकाळी ६ ते ८ या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे

Next Post

खूनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देनारे आरोपी जेरबंद; कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Next Post
खूनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देनारे आरोपी जेरबंद; कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

खूनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देनारे आरोपी जेरबंद; कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

BreakingNews

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

होर्मुझ सामुद्रधुनीतील हेलिकॉप्टर घटनेनंतर अमेरिका-इराण तणाव शिगेला!

पावसाळ्यासाठी मुंबई मेट्रो सज्ज; २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३० पंप कार्यान्वित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.