वृत्तसंस्था : महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना वेड लावणारी ‘सबसे कातील’ गौतमी पाटील सध्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लाइव्ह शो, सिनेमातले आयटम नंबर्स, रिअॅलिटी शो, म्युझिक अल्बमध्येही ती झळकत आहे. त्यामुळं गौतमी आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात दिसणार अशा चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांना आता तिनंच पूर्णविराम दिला आहे.
बिग बॉस मराठीचा ६ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या नृत्यानं, अदांनी वेड लावणाऱ्या गौतमीला बिग बॉसच्या घरात पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असले तरी, ती मात्र आपण तयार नसल्याचं म्हणतेय. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतगौतमीनं बिग बॉससंदर्भातल्या प्रश्नावर उत्तरं दिली. तेव्हा तिनं एक खुलासा केला की, तिला बिग बॉसच्या पाचव्या पर्वासाठीही विचारणा झाली होती. ‘बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनवेळी देखील मला ऑफर आली होती, पण मी ती नाकारली. कारण मी तीन-चार दिवसांपेक्षा जास्त वेळ आईला सोडून राहूच शकत नाही, असं गौतमीनं म्हटलं.

