Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

“मला गुन्हा कबूल नाही”- राज ठाकरे यांचं ठाणे न्यायालयात स्पष्टीकरण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
“मला गुन्हा कबूल नाही”- राज ठाकरे यांचं ठाणे न्यायालयात स्पष्टीकरण
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या २००८ मधील एका जुन्या प्रकरणासाठी ठाणे कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. २००८ मधील जुन्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे आज (११ डिसेंबर) ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या कोर्टात हजर झाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी न्यायाधीशांसमोर “मला गुन्हा कबूल नाही” असं स्पष्ट केलं. यावर न्यायालयानं प्रकरणावर लवकर तोडगा काढायचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांना महत्त्वाचे निर्देश दिले. “तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यायची गरजही लागणार नाही,” असं न्यायालयानं यावेळी म्हटलं.

२००८ मध्ये रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठं नुकसान केलं होतं, असा आरोप होता. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे हे पहिल्यांदाच न्यायालयात हजर झाले होते. समन्स बजावल्यानंतर गुरुवारी सकाळीच राज ठाकरे न्यायालयात हजर झाले. यावेळी अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील न्यायालयात हजर होते .सुनावणीच्या सुरुवातीला ओळख पटवून दिल्यानंतर न्यायाधीश यांनी राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का? असा सवाल केला. यावर राज ठाकरे यांनी “नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी “आपण सहकार्य केल्यास एका महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करू” असं राज ठाकरे यांना सांगितलं.

Previous Post

धक्कादायक! हडपसरमधील खासगी रुग्णालयात तोडफोड

Next Post

अमेरिकेचे दरवाजे खुले! ट्रम्प यांनी जाहीर केला ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा

Next Post
अमेरिकेचे दरवाजे खुले! ट्रम्प यांनी जाहीर केला ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा

अमेरिकेचे दरवाजे खुले! ट्रम्प यांनी जाहीर केला ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.