Lokrakshanay
Tuesday, August 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ऑनलाईन रमी बाबत राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ऑनलाईन खेळ जुगाराला प्रोत्साहन देऊन संबंधित कायद्यांचे उल्लंघन करत आहेत. जुगार हा संधीचा, नशिबाचा खेळ मानला जात असल्यामुळे भारतात त्याला कायदेशीर मान्यता नाही.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
ऑनलाईन रमी बाबत  राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई प्रतिनिधी : जंगली रमी आणि रमी सर्कल हा ऑनलाइन गेमिंग खेळ नशिबाचा की कौशल्याचा भाग आहे ? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि संबंधित गेमिंग ॲपला दिले. जंगली रमी आणि रमी सर्कल या ऑनलाईन खेळांच्या ॲपवर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी सोलापूरस्थित सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी जनहित याचिका केली आहे, मात्र ही याचिका सुनावणीयोग्य आहे की नाही तसेच ऑनलाइन रमी हा संधीचा खेळ न मानता कौशल्याचा खेळ का मानला जातो हे स्पष्ट करण्याचे आदेश प्रतिवाद्यांना दिले.

या ऑनलाईन खेळांची तरुणांना भुरळ पडली असून या जुगारामुळे गंभीर आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. सेलिब्रेटी, क्रिकेटपटू यांच्यातर्फे या ऑनलाईन खेळांच्या जाहिराती करण्यालाही याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध उच्चस्तरीय कार्यालयांना निवेदने देऊन दोन्ही ॲप्सवर बंदी घालण्याची विनंती केली होती, मात्र त्यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आणि कारवाई न झाल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे ननावरे यांनी याचिकेत म्हटले आहे.

हे ऑनलाईन खेळ जुगाराला प्रोत्साहन देऊन संबंधित कायद्यांचे उल्लंघन करत आहेत. जुगार हा संधीचा, नशिबाचा खेळ मानला जात असल्यामुळे भारतात त्याला कायदेशीर मान्यता नाही. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीचा दाखला याचिकाकर्त्यांनी याचिकेत दिला आहे. त्यानुसार, अशा ऑनलाइन जुगाराशी संबंधित ॲपला कोणत्याही प्रकारच्या परवानग्या नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याचा दावा केला आहे.

Previous Post

कोकणात माकडांचा उपद्रव वाढल्याने वन विभागाने माकडे पकडण्याची मोहीम घेतली हाती

Next Post

गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना ‘Z’ श्रेणीची सुरक्षा प्रदान

Next Post
गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना ‘Z’ श्रेणीची सुरक्षा प्रदान

गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना 'Z' श्रेणीची सुरक्षा प्रदान

BreakingNews

लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक

लग्नसमारंभ, मिरवणुकांमध्ये पार्टी पॉपरवरील प्लास्टिक कन्फेटीवर बंदीची मागणी

“मराठी बोलताच आली पाहिजे!” १५ ऑगस्टनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांची होणार परीक्षा – मंत्री सरनाईकांचा इशारा

ठाणे महापालिकेत ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती

११ ऑगस्टपासून दुधाचे दर कडाडणार! दुधासह दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

SIR अंतर्गत मतदार गणनाअर्ज भरण्याची १७ ऑगस्ट हीच अंतिम तारीख!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.