नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. आतिशी नुकत्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत, त्यांनी 21 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी झेड सुरक्षा कवच देण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिली.
प्रोटोकॉलनुसार, गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना झेड श्रेणीच्या सुरक्षेचा अधिकार आहे. सीएम आतिशी यांच्यासाठी झेड श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत 22 दिल्ली पोलिस शिफ्टमध्ये तैनात केले जातील. झेड श्रेणीच्या सुरक्षेमध्ये पीएसओ, एस्कॉर्ट्स आणि सशस्त्र रक्षकांचाही समावेश होतो.
झेड श्रेणीची सुरक्षा ही देशातील तिसरी सर्वात मोठी व्हीआयपी सुरक्षा आहे. झेड सुरक्षेत एकूण 22 जवान असतात. यापैकी चार-पाच एनएसजीचे विशेष कमांडो आहेत, ते अनेक प्रकारच्या निकराच्या लढाईत पारंगत असतात. त्यांना शत्रूचा मुकाबला करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडे एस्कॉर्ट वाहन देखील असते. झेड सुरक्षा पथकात दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही आहेत.