Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर आता १८ नोव्हेंबरला सुनावणी

अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन झाला आहे. तर त्याचे आई-वडील आणि 'ससून'मधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 22, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर आता १८ नोव्हेंबरला सुनावणी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कल्याणीनगर अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर पुढील सुनावणी आता १८ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने पोर्शे अपघात प्रकरणातील सर्व कागदपत्रे बाल न्याय मंडळाकडून मागविली आहेत. ती अद्याप मंडळाकडे परत आलेली नसल्याने सोमवारी (दि. २१) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.

या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. २१) होणार होती. त्यादृष्टीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सर्व तयारी केली होती. मात्र, या प्रकरणाच्या पोलिस रेकॉर्डसह सर्व कागदपत्रे महाजन कोर्टाने काही दिवसांपूर्वीच बाल न्याय मंडळाकडून मागविली आहेत. ती कागदपत्रे आल्यानंतरच पुढील सुनावणी होणार आहे. त्यासाठी दि. १८ नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली आहे. या तारखेला पोर्शे कार मिळण्याबाबत आणि मुलाच्या पासपोर्टबाबत दाखल केलेल्या अर्जावर देखील याच दिवशी युक्तिवाद होणार आहे.

अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन झाला आहे. तर त्याचे आई-वडील आणि ‘ससून’मधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, अपघातप्रकरणी मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात विविध कलमांनुसार कलमवाढ करण्यात आली आहे. तपासात मुलाचा इतर गुन्ह्यांत देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कलमवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता चौकशी केली जाणार आहे.

 

Previous Post

खेड-शिवापुर टोल नाक्यावर पोलिसांनी एका गाडीतून ५ कोटींची रोखरक्कम केली जप्त

Next Post

मालाड मालवणीमध्ये पाणीपुरी विक्रेत्याला मेफेड्रोन(एमडी) या अंमली पदार्थासह पोलिसांनी केली अटक

Next Post
मालाड मालवणीमध्ये पाणीपुरी विक्रेत्याला मेफेड्रोन(एमडी) या अंमली पदार्थासह पोलिसांनी केली अटक

मालाड मालवणीमध्ये पाणीपुरी विक्रेत्याला मेफेड्रोन(एमडी) या अंमली पदार्थासह पोलिसांनी केली अटक

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.