Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्यात ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 3, 2026
in गुन्हेगारी, पुणे
पुण्यात ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ‘पुणं तिथं काय उणं’ हे नेहमी म्हटलं जातं आणि याची प्रचिती ही नेहमी विविध माध्यमातून येत असते. पुणे शहरात गेल्या काही वर्षात विविध शक्कल लावून गुन्हे केल्याचे समोर आले आहे. अश्यातच पुणे पोलिसांकडून गेल्या काही काळापासून ड्रग्जविरोधी मोहीम सुरू केली आहे. आता पुण्यात चक्क ‘पोर्टर डिलिव्हरी ॲप’वरून ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

पुण्यातील उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केलीय. या ॲपच्या माध्यमातून तब्बल ३०० जणांना ड्रग्ज पुरवलं असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय. विशेष म्हणजे, हे सगळे आरोपी एमडी या ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी पोर्टर नावाच्या डिलिव्हरी ॲपचा उपयोग करत होते. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, हे खूप मोठं रॅकेट असून, उत्तमनगर पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. उत्तमनगर पोलीस ठाणे येथे एक अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार होती. तिच्या अपहरणाचा तपास करत असताना माहिती मिळाली की, आरोपी एका ठिकाणी आहे. त्या ठिकाणी पोलिसांचं पथक पाठवण्यात आलं. तिथं आरोपी सापडला. मात्र, त्याची तपासणी केली असताना एमडी ड्रग्जच्या दोन पुड्या सापडल्या. त्याची चौकशी केली असता तो एमडी ड्रग्जमध्ये असल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात ३०० जणांची रजिस्टरची माहिती मिळाली.” याचा पुढं तपास केला असताना या ड्रग्ज प्रकरणात ८ नावं निष्पन्न झाली. यात भय्या तावडे, दहीभाते, नायर आणि नितीन कदम या चार जणांना अटक करण्यात आली असून, चार आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. यात अजून काही नावं समोर येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

रुग्णांच्या दारी पोहचले आरोग्यदूत! ठाणे जिल्ह्यात घरपोच उपशामक उपचार मोहिमेला यश

Next Post

पाकिस्तानात महागाईचा महाभडका; डिझेल ५२० पार, तर पेट्रोलच्या किमतीने गाठला उच्चांक!

Next Post
पाकिस्तानात महागाईचा महाभडका; डिझेल ५२० पार, तर पेट्रोलच्या किमतीने गाठला उच्चांक!

पाकिस्तानात महागाईचा महाभडका; डिझेल ५२० पार, तर पेट्रोलच्या किमतीने गाठला उच्चांक!

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.