Lokrakshanay
Friday, July 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पाकिस्तानात महागाईचा महाभडका; डिझेल ५२० पार, तर पेट्रोलच्या किमतीने गाठला उच्चांक!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 3, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
पाकिस्तानात महागाईचा महाभडका; डिझेल ५२० पार, तर पेट्रोलच्या किमतीने गाठला उच्चांक!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इराण-इस्रायल संघर्षात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानमध्येच कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. डिझेलचे दर आता ५२० रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर पेट्रोलने सुद्धा ४५० रुपयांचा (PKR) टप्पा ओलांडला आहे. केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही, तर पाकिस्तान सरकारने केरोसीनच्या किमतीतही मोठी वाढ केली आहे. केरोसीनचे दर ४५७.८० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकाच वेळी मोठी वाढ केली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. पाकिस्तानकडे सध्या अत्यंत मर्यादित इंधन साठा शिल्लक आहे. माहितीनुसार, देशात केवळ २८ दिवस पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा असून कच्च्या तेलाचा साठा फक्त १० दिवसांचा आहे. देशातील बिघडलेली आर्थिक स्थिती आणि चलनाचे घसरलेले मूल्य यामुळे इंधन आयातीवर मोठा परिणाम झाला आहे.

Previous Post

पुण्यात ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या

Next Post

विजेत्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली! इंडिया स्किल्स स्पर्धेत मिळवली १७ पदके; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पदकविजेत्यांचे अभिनंदन

Next Post
विजेत्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली! इंडिया स्किल्स स्पर्धेत मिळवली १७ पदके; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पदकविजेत्यांचे अभिनंदन

विजेत्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली! इंडिया स्किल्स स्पर्धेत मिळवली १७ पदके; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पदकविजेत्यांचे अभिनंदन

BreakingNews

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!

दुर्गम भागासाठी एसटीच्या २०० मिनी बस; २०३५ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचा सरनाईकांचा निर्णय!

‘तारक मेहता…’ मालिका बंद होणार? सेटवरील बांधकामावर निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा!

वसई-विरारमध्ये पाचव्या दिवशीही ट्रॅक्टरच ठरले जीवनवाहिनी; जलमय रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.