Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या दुरुस्तीला निधीचा अडसर

शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असतानाच वाहतूक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या (सिग्नल) दुरुस्तीसाठी निधीचा अडसर ठरला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 24, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या दुरुस्तीला निधीचा अडसर
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असतानाच वाहतूक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या (सिग्नल) दुरुस्तीसाठी निधीचा अडसर ठरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सिग्नल दुरुस्तीसाठी यावेळी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सिग्नल दुरुस्ती रखडणार असून, शहरातील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदाजपत्रकात निधी उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यानंतर वर्गीकरणाद्वारे तो उपलब्ध करून देण्यासाठी विद्युत विभागाची धावाधाव सुरू झाली आहे. वाहतुकीचे नियमन करताना सिग्नलची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, शहरातील काही भागांतील सिग्नल नादुरुस्त असल्याचे पुढे आले आहे. शहरातील अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यातच रस्त्यावर विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून, गर्दीच्या वेळी अनेकदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेबरोबरच स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सिग्नल उभारणीला प्राधान्य देण्यात आले असून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत १२५ सिग्नल उभारण्याचे नियोजित आहे. स्मार्ट सिटीकडून उभारण्यात येणाऱ्या सिग्नलची देखभाल दुरुस्ती त्यांच्याकडून होणार असून उर्वरीत दुरुस्ती महापालिकेला करावी लागणार आहे.

सिग्नल दुरुस्तीसाठी दरवर्षी अंदाजपत्रकात अडीच ते तीन कोटींची तरतूद केली जाते. नव्याने सिग्नल उभारणी करण्याबरोबरच दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविल्या जातात. मात्र चालू आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात सिग्नल दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर विद्युत विभागाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर विद्युत विभागाकडून महापालिका आयुक्त, प्रशासक डाॅ. राजेंद्र भोसले यांना पत्र देण्यात आले आहे. वर्गीकरणाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न विद्युत विभागाकडून सुरू झाले आहेत.

Previous Post

१०.६७ टक्केच धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक; मुंबईवर पाणी कपातीचे संकट

Next Post

तीन दिवसांत उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर पुण्यात ३२ हॉटेलना टाळे

Next Post
तीन दिवसांत उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर पुण्यात ३२ हॉटेलना टाळे

तीन दिवसांत उत्पादन शुल्क विभागाकडून अखेर पुण्यात ३२ हॉटेलना टाळे

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.