Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

६० लाख ७१ हजार रुपयांची साखर खरेदी व्यवहारात फसवणूक

या प्रकरणी साखर विकत देणारे आणि अन्य दोन एजंट विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 2, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : साखर खरेदी प्रकरणी कोलकाता येथील व्यापाऱ्याची नवी मुंबईतील तिघांनी तब्बल ६० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी साखर विकत देणारे आणि अन्य दोन एजंट विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक कुमार, गौरव मक्कर ( दोन्ही एजंट) साजिद साखर विक्रेता असे आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी उत्तमकुमार बोस हे असून ते कोलकाता येथे राहतात. उत्तमकुमार हे विदेशात साखर निर्यात करत असतात. अशाच एका व्यवहारात त्यांचा परिचय गौरव मक्कर याच्याशी झाला होता. एप्रिल २०२३ च्या सुमारास मक्कर यांनी उत्तमकुमार यांच्या समोर १३५ टन साखर पाठवूयात तशी मागणी आहे असा प्रस्ताव ठेवला. मात्र एवढी साखर एकाच वेळी मिळणार कुठे असा प्रश्न समोर आल्याने मक्कर यांनी नवी मुंबईतील गुवें ट्रेडर्सचे साजिद यांचे नाव सुचवले. साजिद हे एवढी साखर पुरवू शकतात असे सांगितले.

सर्व बोलणी करून हा व्यवहार ठरला. त्यानुसार मक्कर यांनी उत्तमकुमार यांनी मक्कर यांच्या खात्यात ३७ लाख ८१ हजार ५०० रुपये वळवले. मात्र मक्कर यांनी सर्व रक्कम साजिद यांना २५ लाख ९१ हजार ५०० रुपये दिले तर ११ लाख ९० हजार उत्तमकुमार यांना परत केले. या ११ लाख ९० हजार बाबत पुन्हा स्पष्ट करू असे सांगण्यात आले. दरम्यान व्यवहार पुढे सरकण्यासाठी उत्तमकुमार यांनी ३४ लक्ष ४० हजार रुपये साजिद यांना दिले. तर अन्य मध्यस्थी दीपक कुमार यानेही ४० हजार फिर्यादी उत्तमकुमार यांच्या कडून कमिशन पोटी घेतले. अशा प्रकारे फिर्यादीने या व्यवहारात तिघांना मिळून ६० लाख ७१ हजार ५०० रुपये दिले.  हा पूर्ण व्यवहार १० मे ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान झाला आहे. मात्र अद्याप पर्यंत उत्तमकुमार यांनी मागणी केल्या प्रमाणे १३५ टन पैकी एक किलोही साखर पुरवण्यात आली नाही. त्यामुळे अखेर उत्तमकुमार यांनी एनआरआय पोलीस ठाण्याला फसवणूक बाबत अर्ज दिला होता. या अर्जाची पूर्ण शहानिशा करून गुरुवारी एनआयआय पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

Previous Post

११ लाखांची तरुणाची परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

Next Post

१५० कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज छापेमारीत पकडले; पुण्यात पुन्हा मोठी कारवाई

Next Post
१५० कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज छापेमारीत पकडले; पुण्यात पुन्हा मोठी कारवाई

१५० कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज छापेमारीत पकडले; पुण्यात पुन्हा मोठी कारवाई

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.