पुणे : पुणे शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. विश्रांतवाडी भागातून ८० किलोहून अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलेत. ८० किलो पेक्षा आधिक ड्रग्सची किंमत जवळपास १५० कोटी रुपयांच्या घरात आहे. पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच आहे. अशात आता पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये उडता पंजाबप्रमाणे चित्र निर्माण झालं आहे. वारंवार ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर येत असल्याने पुणे शहराला उडता पुणे म्हणण्याची वेळ आली आहे.
विश्रातवाडीमध्ये एक साठा जप्त करण्यात आला होता. आरोपीकडून याबाबतच चौकशी सुरू असताना एका ट्रकमध्ये ३४० किलो एमडी बनवण्यात येणारे रॉ मटेरियल असल्याचे समजले. त्या माहितीनूसार छापा टाकून एमडी ड्रग्सचे रॉ मटेरिएल जप्त करण्यात आलेत. सदर प्रकरणी एकूण ९ आरोपींची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी चौकशीतून मिळालेल्या माहितीमधून आपली कामगीरी चोख बजावलीये. ड्रग्जबाबत अधिक तपास सुरू आहे. ही एक सप्लाय चेन होती. त्यामुळे या प्रकरणी अनेकजण रडावर आहेत. यातील ड्रग्ज परदेशी पाठवलं जात होतं, आता याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.