Lokrakshanay
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘की टू की’ संकल्पनेनुसार पुनर्वसनाची तयारी; रहिवाशांना भाडे व अनुदानाची सुविधा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 16, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सेक्टर ६ मधील पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याआधी येथील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन रहिवाशांना सार्वजनिक सूचनेद्वारे करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी झोपड्या हटवून त्या जागेवर नव्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पाअंतर्गत माटुंगा येथील रेल्वेच्या जागेवरही कामाला सुरुवात झाली असून, येथे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्याबरोबरच धारावीकरांसाठी पुनर्वसन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेला आता प्रत्यक्ष गती मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकल्पात ‘की टू की’ म्हणजेच जुन्या घराच्या बदल्यात थेट नवीन घराची चावी देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जागा मोकळी करणे आवश्यक असल्याने सेक्टर ६ मधील सुमारे ३५ एकर परिसरातील झोपड्या रिकाम्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गणेशनगर–मेघवाडी, एसव्हीपी नगर, आजाद नगर (अ, ब, क) तसेच कमला रमण नगर येथील रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. रहिवाशांनी वेळेत घरे रिकामी न केल्यास प्रकल्पात विलंब होऊन त्याचाच फटका त्यांना बसेल, असा इशाराही देण्यात आला आहे. स्थलांतरासाठी रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळे किंवा घरभाड्याचा पर्याय देण्यात येणार असून, घर रिकामे करण्यासाठी ५ हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. तसेच भाडे पर्याय निवडणाऱ्यांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत दरवर्षी ५ टक्के वाढीसह भाडे दिले जाणार आहे. स्थलांतर प्रक्रियेसंदर्भातील शंका दूर करण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्प येथे विशेष सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले असून, रहिवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रशासनाने केले आहे.

Previous Post

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

Next Post

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

Next Post
CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

BreakingNews

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो लक्ष द्या! फळपिक विम्यासाठी ३० नोव्हेंबर शेवटची मुदत

५० वर्षांचा संघर्ष संपला; हनुमाननगर-चंद्रनगरच्या ग्रामस्थांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाणीटंचाईत टँकर बुकिंगसाठी फोन करण्याचे टेन्शन मिटले; आता ॲपवरून करा वॉटर टँकर बुक!

महाराष्ट्रातील मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवा प्रयोग; आंध्रच्या कोळंबी प्रकल्पांची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी

ऑस्करच्या शर्यतीतील मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता जगभरात गाजणार; होम्बळे फिल्म्स करणार ओव्हरसीज रिलीज!

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.